Home Top News दत्तधाम गार्डन मध्ये श्री दत्त मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ

दत्तधाम गार्डन मध्ये श्री दत्त मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ

0
70

बीड/प्रतिनिधी : शहरातील कृष्ण नगर,फुलाई नगर,स्वा सावरकर चौक, गुरुप्रसाद कॉलनी, आणि नेत्रदान परिसरातील भाविक भक्तांच्या सहभागातून दत्तधाम गार्डन या ठिकाणी श्रीकांत काळे यांच्या हस्ते सपत्नीक श्रीदत्त मंदिर बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी परिसरातील शेकडो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

गेल्या तीन वर्षापासून दत्तधाम गार्डन परिसरात श्रीदत्त मंदिराची उभारणी करण्याचा मनोदय या भागातील नागरिकांनी व्यक्त केला होता श्रीदत्त मंदिर निर्माण नावाच्या व्हाट्सअप ग्रुप वर यावर सातत्याने चर्चा आणि निर्णय होत होते अखेर आज श्रीदत्त जयंती निमित्त परिसरातील भाविकांच्या सहभागातून श्रीदत्त मंदिर उभारणीचा निर्णय घेण्यात आला या परिसरात विठ्ठल मंदिर, संत नरहरी महाराजांचे मंदिर कृष्ण मंदिर,सत्संग भवन असून श्रीदत्त मंदिर देखील आता होत आहे आज दुपारी साडेअकरा वाजता या जागेचे मालक श्रीकांत काळे यांच्या हस्ते सपत्नीक भूमिपूजन करून मंदिर बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहात मंदिर बांधकामासाठी सहभाग घेतला,मंदिराबरोबरच येथे गार्डन निर्माण होणार असून परिसरातील नागरिकांसाठी विसावा मिळणार,हे मंदिर झाल्यावर याठिकाणी विविध उपक्रम राबवण्यास लग्न समारंभ आणि धार्मिक कार्यक्रम घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे,आज झालेल्या कार्यक्रमास परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here