Home Top News ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीच्या विजयाचे रणशिंग

ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीच्या विजयाचे रणशिंग

0
70
तीन ग्रामपंचायती बिनविरोध आ.संदीप क्षीरसागरांच्या ताब्यात
बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यासह विधानसभा मतदारसंघातील १३२ ग्रामपंचायतींपैकी ३ ग्रामपंचायतीचे सरपंचपद मतदानाअगोदरच आ.संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विजयाचे रणशिंग फुंकले आहे असेच म्हणावे लागेल.
            बीड तालुक्यातील रूई शहाजानपूर ग्रामपंचायत येथे दिनकर भोस्कर, बोरखेड ग्रामपंचायत येथे फुलाबाई रोहीदास पवार व आहेर चिंचोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विकास भास्करराव रकटे यांची ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. हे सर्व राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व आ.संदीप क्षीरसागर यांचे समर्थक आहेत. या तीनही ग्रामपंचायतीमधील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे यश मिळणार असल्याचे चित्र आहे. सुरूवातीलाच तीन ग्रामपंचायती राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या ताब्यात बिनविरोध दिल्या बद्दल समस्त ग्रामस्थ मतदारांचा मी आभारी असून सर्व ग्रामपंचायतींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here