Home Top News जिल्हा रुग्णालयात लेट येणार्या १५ डाॅक्टरांवर कारवाई

जिल्हा रुग्णालयात लेट येणार्या १५ डाॅक्टरांवर कारवाई

0
72

डाॅ.सुरेश साबळे यांच्या जिल्हा रुग्णालयात अनेक विभागात भेटी;भेटी दरम्यान अनेक डाॅक्टर गैरहजर दिसले

प्रारंभ न्युज

बीड : जिल्हा रुग्णालयातील विविध विभागात आज (ता. ०५) जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांनी सकाळी भेट दिली. यावेळी अनेक विभागात गैरहजर असणार्या १५ डाॅक्टरांवर कारवाई करत अर्ध्या दिवसाचा पगार कपात केला यासह नोटिसा सुद्धा दिल्या.

जिल्हा रुग्णालयात डाॅ. सुरेश साबळे यांनी जिल्हा रुग्णालयातील सर्व यंञणा सुरळीत केली आहे. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत. वारंवार सर्व विभागात भेटी देत असल्यामुळे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. आज डाॅ. सुरेश साबळे यांनी सकाळी जिल्हा रुग्णालयातील विविध भागात भेटी दिल्या, यावेळी अनेक विभागात डाॅक्टर हजर नव्हते, यामुळे डाॅ.सुरेश साबळे यांनी जवळ पास १५ डाॅक्टरांवर कारवाई करत अर्ध्या दिवसाचा पगार कपात केला. आजच्या कारवाईमुळे सर्वांना शिस्त लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here