Home Top News इस्कॉन मंदिरामध्ये हरिनाम दिंडी व भगवद्गीता ज्ञानदान यज्ञ संपन्न

इस्कॉन मंदिरामध्ये हरिनाम दिंडी व भगवद्गीता ज्ञानदान यज्ञ संपन्न

0
72
बीड प्रतिनिधी :- सावता माळी चौकातील श्री श्री राधा गोविंद मंदिरातर्फे गीता जयंती निमित्त बीड ते रामगड हरिनाम संकीर्तन दिंडी ,भगवद्गीता ज्ञानदान व संपूर्ण भगवद्गीता पठण कार्यक्रम संपन्न झाला .
परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जगामध्ये हरिनाम संकीर्तन दिंडी म्हणजेच पदयात्रा वर्ल्ड वाईड यांच्या अंतर्गत गीताजयंतीच्या  दिवशी श्री श्री राधा गोविंद मंदिर ते रामगड या तीर्थस्थानापर्यंत “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे! हरे राम हरे राम राम राम हरे हरे !! या महामंत्राचा गजर करीत तसेच महालक्ष्मीचे दर्शन घेऊन संकीर्तन दिंडी राम गडाला पोहोचली.
“परित्राणाय साधूनामं विनाशायेच दुष्कृतां” या गीतेच्या श्लोकाद्वारे कशाप्रकारे भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये पांडवांना विजयी करून कौरवांचा म्हणजेच दुष्ट शक्तींचा ऱ्हास केला व पुन्हा धर्माची स्थापना केली ,असे अनुमोदन दक्षिण आफ्रिकेचे प.पू. रामगोविंद स्वामी महाराज यांनी आपल्या गीतेच्या प्रवचनांमधून बोध दिला.
मोक्षदा एकादशीच्या दिवशी दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये भगवद्गीता ज्ञान यज्ञ संपन्न करण्यात आला. श्रीमद् भगवद्गीतेतील संपूर्ण 700 श्लोकांचे व 18 अध्यायांचे पठण यावेळी करण्यात आले. परमपूज्य राम गोविंद स्वामी महाराज यांनी भगवद्गीता हे शास्त्र सर्व मानव समाजासाठी असून अर्जुनाला निमित्त मात्र बनवून सर्वांसाठी हा संदेश महाभारतातून दिलेला आहे . सर्व मनुष्य समाज्याने या गीतेच्या शिकवणीतून आपले जीवन कशा प्रकारे सुखी आणि समृद्धी होऊ शकते व भगवद्गीतेचे अध्ययन वाचन व इतरांना प्रबोधन केल्याने कशाप्रकारे व्यक्ती भगवान श्रीकृष्णांचे भक्त, धामप्राप्ती व भगवान श्रीकृष्णांना विशेषत्वाने प्रिय व्यक्ती होऊ शकतो ,हे सांगितले. या कार्यक्रमासाठी इस्कॉन बीड चे अध्यक्ष श्रीमान विठ्ठल आनंद प्रभू श्रवणभक्ती प्रभू ,यादवेंद्र प्रभू व राधा गोविंद भक्त समाज यांचे विशेष सहकार्य लाभले अशी माहिती इस्कॉन बीडचे प्रतिनिधी श्रीमान कृष्णनाम दास यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here