Home Top News एटीएमची अदलाबदल करून 58 हजार रुपये काढले

एटीएमची अदलाबदल करून 58 हजार रुपये काढले

0
72

बीड शहरातील घटना; एटीएममध्ये सुरक्षारक्षक दिसेनात

बीड । प्रतिनिधी
नियमानुसार सर्वच एटीएममध्ये सुरक्षारक्षकांची नियुक्ती गरजेची असताना सुद्धा याकडे अनेक बँका दुर्लक्ष करत आहेत. याचाच फायदा घेत चोरटे आता एटीएम मशीनमध्ये सुद्धा ग्राहकांची लूट करू लागले आहेत. बीड शहरातील राष्ट्रवादीभवन समोरील एका एटीएममध्ये गेले असता एका ग्राहकाच्या एटीएमची अदलाबदल करून एटीएममधून 58 हजार रुपये काढल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात 2 ते 3 चोरट्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
जगन्नाथ बोबडे (वय 25) हे बीड शहरातील राष्ट्रवादी भवन परिसरातील एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या मागून एका अनोळखी व्यक्तीने त्यांना न कळत त्यांच्या एटीएमची अदलाबदल करून 58 हजार रुपये काढले, हा प्रकार बोबडे यांच्या लक्षात आल्यानंतर बोबडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. बोबडे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी दोन ते तीन व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here