Home Top News बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने खिशातील 30 हजार लांबविले

बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने खिशातील 30 हजार लांबविले

0
69

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : शहरातील बसस्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या खिशातील 30 हजार रुपये लांबविल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
शहरातील सुनिल मच्छिंद्रराव गोरे (वय 40) हे कामानिमित्त बाहेरगावी जात असताना बीड शहरातील बसमध्ये चढत होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील 30 हजाराची रक्कम लंपास केली. गोरे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here