Home Top News नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना अजूनही मावेजा मिळेना

नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना अजूनही मावेजा मिळेना

0
71

न.प.च्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

बीड । प्रतिनिधी
बीड शहरातील लक्ष्मणनगर भागातील नागरिकांना नगरपालिकेने अद्यापही भूसंपादनाचा मावेजा न मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
नगर पालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनगोंदी कारभार सुरू असून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम येथील काही भ्रष्ट अधिकारी करत आहेत. यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. लक्ष्मणनगर भागातील नागरिकांना मावेजा न मिळाल्यामुळे तेथील नागरिकांनी अनेकवेळा संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला असताना सुद्धा त्यांच्या मावेजाचा प्रश्‍न मार्गी लागत नसल्यामुळे तेथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात सुनील शेरकर, भास्कर ठोकरे, सय्यद महेबूब, सागराबाई शेरकर, उर्मिला शेरकर, सय्यद मुस्ताक, राजेश शेरकर, गोरख शेरकर, शशीकला, निखिल शेरकर, आदिल शेख सह आदींनी सहभाग नोंदवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here