Home Top News जिल्ह्यातून दोन दुचाकी चोरीस; केज व पाटोदा पोलीसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

जिल्ह्यातून दोन दुचाकी चोरीस; केज व पाटोदा पोलीसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

0
93

बीड । प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून मंगळवारी जिल्ह्यातून दोन दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे. यातील एक दुचाकी पाटोदा तालुक्यातून तर दुसरी दुचाकी केज तालुक्यातून चोरी गेली असून संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीराम अण्णासाहेब सोनवणे (वय 24) यांनी त्यांची दुचाकी (क्र.एम.एच.44 डब्ल्यू-8473) केज-धारूर रोडवरील सानेगुरूजी शाळेजवळ लावली होती. येथूनच अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे हँडल तोडून दुचाकी लंपास केली तर दुसरी घटना पाटोदा तालुक्यातील दिपक विकास आरसुळे (वय 37) यांनी त्यांची दुचाकी (क्र.एम.एच.23 ए.के.0794) बेनसूर येथील भाऊसाहेब विठ्ठल आरसूळ यांच्या घरासमोर लावली असता तेथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. याप्रकरणी केज व पाटोदा पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here