अंबाजोगाई । प्रतिनिधी
तुम्ही आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिकची रक्कम मिळेल असे आमिष दाखवून फिर्यादीचे घेतलेले 18 लाख 64 हजार 500 रुपये न दिल्यामुळे फिर्यादीच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीसात भिसे दाम्प्त्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुहास दयावानराव मस्के (वय 33), व्यवसाय लोन ॲडव्हायजर रा.भीमनगर यांनी गणेश राजाराम भिसे व पूजा गणेश भिसे यांच्या मे.स्वराज्य जीआरबी इंडस्ट्रीज प्रा.लि.कंपनी यामध्ये 33 लाखांची गुंतवणूक केली होती. मस्के यांना ही गुंतवणूक करण्यासाठी भिसे दाम्पत्याने अधिकचे पैसे मिळणार असल्याचे आमिष दाखवले होते परंतु नंतरच्या काळात मस्के यांना 14 लाख 35 हजार 500 रुपये देण्यात आले. नंतर राहिलेले मुद्दत 18 लाख 64 हजार 500 रुपये देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे मस्के यांच्या फिर्यादीवरून गणेश राजाराम भिसे व पूजा गणेश भिसे रा.विवेकानंद नगर, अंबाजोगाई यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा अंबाजोगाई शहर पोलीसात दाखल झाला आहे. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.




















