Home Top News गद्दार सरकार थोड्या दिवसात पडणार — आदित्य ठाकरे

गद्दार सरकार थोड्या दिवसात पडणार — आदित्य ठाकरे

0
71

बीड जिल्ह्यातील नुकसानीची केली पाहणी

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : ५० खोके एकदम ओके पण राज्य ओके आहे का? हे सरकार थोड्या दिवसात पडणार असल्याचे मत आज (ता. ०८) बीडच्या दौर्यावर आल्यानंतर माजीमंञी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली, यावेळी त्यांनी शेतकर्यांना आधार देण्याचे काम केले. तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. आदित्य ठाकरे यांनी पाडळसिंगी व चौसाळा परिसरातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, दुसरे जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव, महिला आयोगाच्या सदस्या संगिता चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here