Home Top News नगरपंचायत केज अंतर्गत रमाई आवास घरकुल योजना २०२२-२३ च्या २७ लाभार्थ्यांना मंजुरी...

नगरपंचायत केज अंतर्गत रमाई आवास घरकुल योजना २०२२-२३ च्या २७ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता वाटप 

0
89

केज /प्रतिनिधी

दि.१२ ऑक्टोंबर २०२२ रोजी केज नगरपंचायत अंतर्गत रमाई आवास घरकुल योजना सन २०२२-२०२३ च्या पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देऊन पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. या योजनेमध्ये एकूण २७ लाभार्थी यांची निवड झाली आहे.
यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हरून भाई इनामदार आणि नगराध्यक्षा सौ. सिताताई प्रदीप बनसोड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले.
यावेळी गटनेते राजू भाई इनामदार, नगरसेवक जलाल भाई इनामदार, नगरसेवक पप्पू अण्णा इनामदार, नगरसेविका आशाताई कराड, नगरसेवक ओम रांजणकर सह नगरपंचायत चे कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here