Home Top News Beed राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना शरद पवारांचा विसर

Beed राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना शरद पवारांचा विसर

0
71

राष्ट्रवादी भवन येथे लावण्यात आलेल्या बॅनर वरुन खा. शरद पवार यांचा फोटो गायब

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील बुधवारी (ता. २१) बीडच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर वरुन चक्क राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच फोटो गायब झाला होता. राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना शरद पवार यांचा विसर पडला का? खरंच राष्ट्रवादीत गट पडत आहेत यासह इतर चर्चा रंगल्या होत्या.

दिवसेंदिवस राज्यातील राजकारण बदलत आहे. आघाडी सरकार मधून शिंदे गट बाहेर पडल्या नंतर राज्यामध्ये शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाले. यावरून लक्षात येते की पक्षामध्ये किती मोठी गडबाजी होऊ शकते. सध्या जर पाहिलं तर प्रत्येकच पक्षांमध्ये पाहिलं तर छोटी मोठी गडबाजी दिसून येत आहे. काल बीडमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंञी जयंत पाटील आले होते, त्यांच्या स्वागतासाठी बीड येथील राष्ट्रवादी भवन या ठिकाणी जे मोठे बॅनर लावले होते त्या बॅनरवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच फोटो नव्हता यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला शरद पवार यांचाच विसर पडल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे शरद पवार यांचा फोटो टाकण्याचे विसरले का? खरंच गटबाजी आहे  का यासह इतर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here