Home Top News सुशी येथे बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून जनावरांना लंपीची लस

सुशी येथे बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून जनावरांना लंपीची लस

0
71

गेवराई  प्रतिनिधी : तालुक्यातील सुशी, सुशीतांडा येथील सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की शिवसेना नेते माजीमंत्री बदामराव पंडीत यांच्या उपस्थितीत उद्या बुधवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ९ वाजेपासून गोवंशीय जनावरांसाठी मोफत लपी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व पशुधारक शेतकरी बांधवांनी आपल्या पशुचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते बदाम पौळ यांनी केले आहे. राज्यात सर्वत्र लंपी या आजाराने जनावरांमध्ये संसर्ग वाढला असल्याने पशुधन मालक हतबल होत आहेत. आपले पशुधन या आजारापासून वाचवण्यासाठी जनावरांना लंपीची
लस देणे गरजेचे आहे. या अनुषंगाने उद्या बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ वाजता सुशी येथील मारोती
मंदीराजवळील प्रांगणात गोवंशीय जनावरांना मोफत लंपीची लस दिली जाणार आहे. तरी आपल्या पशुधनाला लंपी पासून दूर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी या मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा
असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते बदाम पौळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here