Home Top News पदाधिकार्‍यांनी नवीन उत्साहात काम करावे- जिल्हाप्रमुख खांडे

पदाधिकार्‍यांनी नवीन उत्साहात काम करावे- जिल्हाप्रमुख खांडे

0
73

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अभियान राबवणार
शिवसेनेच्या नुतन पदाधिकार्‍यांचा जिल्हाप्रमुख खांडेंच्या हस्ते सत्कार

बीड प्रतिनिधी – शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. आता आपल्याला पहिल्या पेक्षा अधिक जोमाने आणि नवीन उत्साहाने काम करावे लागणार असून येणार्‍या सर्व निवडणूकांमध्ये शिवसेनेचा भगवा जिल्हाभर फडकावण्याची तयारी आपण सर्वांनी करायची आहे. शिंदे साहेबांनी दाखवलेला विश्‍वास आपण कायम ठेवू गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे अभियान आपल्याला राबवायचे आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले.शिवसेनेचे नुतन उपजिल्हाप्रमुख,तालूकाप्रमुख व शहर प्रमुखांच्या  यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते नगरनाका संपर्क कार्यालय येथे नुतन उपजिल्हाप्रमुख, तालूका प्रमुख,शहर प्रमुख आदिंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्हाप्रमुख खांडे यांनी म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन आपल्या सर्वांची निवड झालेली आहे. शिवसेनेचा भगवा आपल्याला कायम फडकावत ठेवायचा आहे. शिंदे साहेबांचे बीड जिल्ह्यावर कायम लक्ष असते. आपल्या सर्वांकडून त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या आपण नक्कीच पुर्ण करु असे जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख खांडे यांच्या हस्ते उपजिल्हाप्रमुख जयसिंग मामा चुंगडे (बीड), शेख एजाजभाई (गेवराई), भरत जाधव (पाटोदा) या उपजिल्हाप्रमुखांचा तर तालूकाप्रमुख संतोष घुमरे( बीड), परमेश्‍वर बेदरे (गेवराई), कुमार शेळके (आष्टी) या तालूका प्रमुखांचा व शहर प्रमुख कल्याण कवचट(बीड), श्रीनिवास ढाकणे (गेवराई), महेश धोंडे (आष्टी), परमेश्‍वर खेडकर (कडा) यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी जिल्हाभरातून आलेले शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here