Home Top News अपहरण करूण एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अपहरण करूण एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
75

गेवराई पोलिसांत दोघाविरोधात गुन्हा

गेवराई । प्रतिनिधी : बाजारपेठेत कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या तोंडाला रुमाल बाधून दोघा जणांनी बळजबरीने बीड या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आज (ता. ३०)  दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की,पिडीत अल्पवयीन मुलगी ही मुळ अंबड तालुक्यातील आहे. तसेच नागझरी ता.गेवराई या ठिकाणी तीचे आई वडिल शेतात सालाने कामकाज करतात.सोमवार दि.२९ रोजी पिडीता ही तिच्या चुलती सोबत गेवराईला कपडे खरेदी करण्यासाठी आली होती.तिच्या चुलतीच्या मोबाईलचे रिचार्ज संपले होते.ते रिचार्ज करूण येते तुम्ही थांबा असे सांगितले.त्यानंतर आरोपीनी पिडीतेच्या तोंडाला रुमाल लाऊन बळजबरीने गाडीत घालून बीडला घेऊन गेले.त्या ठिकाणी एका कॉफीशॉपमध्ये घेऊन परिसरात तिच्या ईच्छेविरूद्ध अत्याचार केला असल्याची तक्रार पिडीतेने गेवराई पोलिसांत तक्रार दिली.गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोन्ही आरोपीना अटक करण्यात येऊन त्यांच्या विरूद्ध बालसंरक्षण कायदा,लैंगिक अत्याचार,अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सोप्नील राठोड करत हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here