Home Top News राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन

0
86

बीड-राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांचे हस्ते यावेळी महाआरती करण्यात आली.

मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हस्ते राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंदिराच्या विश्वस्तांनी देवीची प्रतिमा व शाल देऊन राज्यपालांचा सत्कार केला.
मंदिर व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गिरिधारी भराडिया, सचिव अँड शरद लोमटे , सदस्य डॉ.संध्या जाधव, राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे , प्राध्यापक अशोक लोमटे , पूजा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार झाला.

याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने राज्यपाल श्री कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले . पुरातन योगेश्वरी मंदिराच्या विकासासाठी निधी व शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी याद्वारे करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार , अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार बिपीन पाटील आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here