Home Top News राजकारणातील विरोध मान्य पण मृत्यू नाही…! साहेबांमुळे राजकारणात आलो – राजेंद्र मस्के

राजकारणातील विरोध मान्य पण मृत्यू नाही…! साहेबांमुळे राजकारणात आलो – राजेंद्र मस्के

0
70

स्व. विनायकराव मेटे साहेबांना भाजपा तर्फे श्रद्धांजली..!

बीड प्रतिनिधी  : कोणताही राजकीय वारसा पाठीशी नसताना प्रचंड मेहनत आणि जिद्दीने स्वकतृत्वातून मेटे साहेबांनी राजकारणात उंची गाठली होती. स्व. आण्णासाहेब पाटला नंतर मराठा आरक्षणाची चळवळ जिवंत ठेवली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आज निर्णायक वळणार आणून ठेवण्याचे काम मेटे साहेबांनी केले. मराठा आरक्षण चळवळीतील त्यांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. तरुण वयापासूनच समाजसेवेचा ध्यास घेऊन, मराठा समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट घेतले. व्यसनमुक्ती आणि सामुहिक विवाहाची चळवळ समाजामध्ये रुजवली. शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली.माझ्या जीवनातील साधारण चोवीस वर्षाचा कालखंड त्यांच्या सहवासात गेला. त्यांच्यामुळे समाजकारण आणि राजकारणाची ओढ मला लागली. मस्के परिवाराचे मेटे साहेबांशी राजकारणा पलीकडे कौटुंबिक नाते आहे. मला नेहमी मोठ्या बंधूप्रमाणे प्रेम आणि मार्गदर्शन मिळाले. राजकीय मतभेदातून मी दूर असलो तरी, आमचे परिवारिक ऋणानुबंध कायम आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने मला धक्का बसला असून, समाजाचे अतोनात नुकसान झाले. राजकारणातील त्यांचा विरोध मला मान्य आहे,परंतु त्यांचा अकाली मृत्य कदापि मान्य नाही.असी उद्विग्न भावना प्रकट करून, साश्रू नयनांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी स्व. विनायकराव मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.आज मेटे आणि शिवसंग्राम परिवारावर कोसळलेला दुःखाचा डोंगर पेलण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
परवा बीड जिल्हाचे भूमिपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष शिवसंग्रामचे नेते तसेच मराठा आरक्षण चळवळीचे झुंजार नेते स्व. मा. आ. विनायकराव मेटे साहेब यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संघर्षयोद्धा भारतीय जनता पार्टी कार्यालय बीड येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, चंद्रकांत फड, भगीरथ बियाणी, अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, डॉ. अभय वनवे, सुभाष धस, सोमनाथराव माने,किरण बांगर यांच्या सह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

यावेळी प्रमोद रामदासी, शांतीनाथ डोरले, अनिल चांदणे, मारुतीराव तिपाले, विलास बामणे, दुष्यंत डोंगरे, किरण देशपांडे, गणेश पुजारी, संभाजी सुर्वे, छायाताई मिसाळ, मीराताई गांधले, संध्याताई राजपूत, अनिताताई जाधव, प्रीतताई कुकडेजा, शीतलताई राजपूत, प्रा.नवले सर, विठ्ठल ठोकळ, संतोष गवळी, अशोक पांढरे, लालासाहेब पन्हाळे, कल्याण पवार, अश्वीन शेळके, वसंत गुंदेकर, नरेश पवार, बंडू मस्के, सचिन अगाम, शरद बडगे, राजेश चरखा, शफिक पेंटर, रवींद्र कळसाने, महेश सावंत, अजय सावंत, गणेश सांगूळे, आबा येळवे, ईश्वर पाव्हणे, समीर बेग, साहेबराव राठोड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here