Home Top News मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडू काय म्हणाले पहा!

मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडू काय म्हणाले पहा!

0
74

मंत्रीपद नाही दिलं तर भांडायचं का?

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आमचा उद्देश मंत्रीपदासाठीचा नाही, मी एवढा लहान विचारांचा माणूस नाही. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रीपदाचा शब्द दिला आहे, तो शब्द ते नक्की पूर्ण करतील एवढा विश्‍वास आहे. मात्र, नाही दिलं तर भांडायचं का? असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. येणाऱ्या विस्तारात मंत्रीपद देऊ असे ते म्हणाले होते. मात्र, आता काही तांत्रिक कारण असेल, त्यामुळे अपक्षांना मंत्रीपद देण्यात आले नाही. कधी कधी दोन पावलं मागे यावं लागतं. त्यामुळे मी अजूनही त्यांच्या शब्दावर विश्‍वास ठेवतो आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here