Home Top News बीड तालुक्यात सशस्ञ दरोडा: पाच तोळे सोने व नऊ लाख रुपये लंपास

बीड तालुक्यात सशस्ञ दरोडा: पाच तोळे सोने व नऊ लाख रुपये लंपास

0
74

आठ ते दहा दरोडेखोरांनी राञी दिडच्या सुमारास टाकला दरोडा

प्रारंभ न्युज

बीड : तालुक्यातील वडवाडी येथे राञी आठ ते दहा दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकत नऊ लाख रोख रक्कम व पाच तोळे सोने संपला केल्याची घटना आज (ता. ०४) उघडकीस आली. घरातील दोन जणांना मारहाण केली आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली.

बीड तालुक्यातील बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री अभिमान शाहूराव अवसर व त्यांच्या पत्नी सत्वशीला अभिमान अवसर यांच्या घरी बुधवारी राञी दिड वाजता अज्ञात आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकत घरातील नऊ लाख रुपये व पाच तोळे सोने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहे. एवढा मोठा सशस्ञ दरोडा पडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here