Home Top News व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी यांना पितृशोक

व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी यांना पितृशोक

0
88

जगन्नाथजी सोहनी यांचे  आज दुःखद निधन

प्रारंभ न्युज

बीड : व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी यांचे वडिल जगन्नाथजी सोहनी (वय ८५ ) यांचे आज (ता. २६) सकाळी दु:खद निधन झाले. त्यांच्यावर बीड शहरातील अमरधाम येथे दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात तीन मुलं, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.जगन्नाथ सोहनी यांच्या निधनामुळे सोहनी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोहनी परिवाराच्या या दु:खात प्रारंभ परिवार सहभागी आहे. सोहनी परिवाराला या दु:खातुन सावरण्याची इश्वर शक्ती देवो. अंत्यविधी वेळी आमदार संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम,  आ. सुनिल धांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप,  जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, युवा नेते योगेश क्षीरसागर, भाजपाचे नेते सर्जेराव तांदळे, भाजपाचे शहराध्यक्ष भगिरत बियाणी यासह व्यापारी बांधव, राजकिय क्षेञातील नेते, पञकारिता क्षेञातील बांधव, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतै.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here