Home Gate Way OF india माजी मंत्री सुरेश नवले शिंदे गटात प्रवेश करणार?

माजी मंत्री सुरेश नवले शिंदे गटात प्रवेश करणार?

0
91

दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : माजी मंत्री सुरेश नवले यांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून ते लवकरत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर  बीड शहरात  सुरेश नवले मित्र मंडळाकडून फटाके फोडण्यात आले होते.

1990 व 1995 ला बीड विधानसभेसाठी शिवसेनेकडून राज्यातील सर्वात पहिला उमेदवार स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश नवले यांचे नाव घेऊन जाहिर केला होता. अत्यंत विश्‍वासू म्हणून माजी मंत्री सुरेश नवले ठाकरे परिवाराच्या जवळचे होते. माजी मंत्री सुरेश नवले यांनी बीड जिल्ह्यात शिवसेना पक्ष मोठा केला होता. सध्या ते सुरेश नवले मित्र मंडळाच्या माध्यमातून बीड मध्ये काम करत आहेत. आज त्यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून ते लवकरच शिंदे गटात सहभाग घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here