बीड प्रतिनिघी – सी.एन.एस. जीमच्या वतीने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी कपिलधार येथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेकिंगमध्ये जवळपास 300 जणांनी सहभाग नोंदवला. या ट्रेकिंग स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना डॉ.योगेश क्षीरसागर व डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, आजच्या दिवसाची सुरवात निसर्गाच्या सानिध्यात झाल्याने मन अगदी प्रसन्न झाले आहे. आपण आपल्या रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढत निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवला पाहिजे. आजचा अनुभव निरोगी व तंदुरुत शरीरासाठी नवऊर्जा देणारा होता असे त्यांनी सांगितले. यावेळी सी.एन.एस. जीमचे डॉ.इलियास खान यांच्यासह सर्व प्रशिक्षक व सहभागी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















