Home Top News भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर...

भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट

0
74

जन्मदिनाच्या निमित्ताने शास्त्रींनी धनंजय मुंडेंना संत भगवानबाबांची प्रतिमा भेट देत दिले आशीर्वाद

संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला’, या अभंगवणीचा प्रत्यय आला – धनंजय मुंडे

परळी : भगवानगडाचे महंत ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मुंडेंच्या परळी येथील पंढरी या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट दिली.

यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी नुकताच पार पडलेल्या धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त श्री. मुंडे यांना संत भगवानबाबा यांची भव्य प्रतिमा भेट देऊन आशीर्वाद दिला. याप्रसंगी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणीबाई मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, प्रा. निलेश आघाव आदी उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांनी देखील मुंडे कुटुंबाच्या वतीने महंत नामदेव शास्त्री यांचे स्वागत करत आशीर्वाद घेतले. आज सकाळीच संतांचे दर्शन थेट घरी लाभले, संतांच्या सान्निध्यात ईश्वर प्राप्ती होते, असा आशय सांगणाऱ्या ‘संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला…’ या अभंगवणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आला असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here