Home Top News Beed : पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांना याठिकाणी मिळणार टोल फ्री पास

Beed : पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांना याठिकाणी मिळणार टोल फ्री पास

0
69

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आषाढी वारीसाठी राज्यातील वारकरी व भाविक पंढरपुरला मोठ्या संख्येने जात असतात. यात बीड जिल्ह्यातील वारकरी सुद्धा मोठ्या संख्येने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरला जातात. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांसाठी व वारकऱ्यांसाठी टोल फ्री केला आहे. टोल फ्री पास हे  बीड जिल्हा वाहतुक शाखा व संबंधित पोलीस स्टेशन येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तरी भाविकांनी संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन हे पास घ्यावेत असे आवाहन बीड जिल्हा वाहतुक शाखेच्या वतिने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here