Home Top News मंञी शिंदे यांच्या बंडानंतर मंञी सुरेश नवलेंची हि भुमिका!

मंञी शिंदे यांच्या बंडानंतर मंञी सुरेश नवलेंची हि भुमिका!

0
80

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे प्रा नवले मित्रमंडळा कडून सर्मथन

 

बीड । प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथराव शिंदे यांनी व त्यांच्या सर्मथक शिवसेना आमदारांनी जी भूमिका आज घेतली आहे ती योग्य आहे.महाराष्ट्रामध्ये तळागाळातील सामान्य शिवसैनीक हा शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेवर प्रेम करीत होता पण अलीकडे त्याचा हळूहळू भ्रमनिरास होऊ लागला, शिवसेना आपल्या ध्येय धोरणापासून लांब चाललेली त्याला खटकत होते.पूर्वी शिवसेना सत्तेत नसताना तिचा एक धाक होता,शिवसैनीक म्हणले तरी त्याचे काम होत होते त्याउलट आज शिवसेना सत्तेत असताना सामान्य शिवसैनीक हतबल वाटत आहे आपल्या पक्षाच्या नेतृत्वाची भेट त्याला दुर्मिळ झाली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मुबंईला गेलेल्या शिवसैनीकांना भेटायला कोणी मिळत नाही मातोश्रीवर गेल्यावर भेटीची वेळ घेतली का म्हणून गेटवरच कार्यकत्पाला अडवले जाते त्यात संजय राऊत,मिलींद नार्वेकर हयांनी शिवसेना संपवप्याची जणू काहीं विरोधकांकडून सुपारी घेतली कि काय अशीच शिवसैनीकांची भावना झाली याउलट महाराष्ट्रामधून मुबंईला गेलेला शिवसैनीक एकनाथ शिंदे साहेबांकडे आशेने आपले काम घेऊन गेला तर शिंदे साहेब त्याला वेळ देत असत त्याचे काम मार्गी लावत,शिंदेसाहेब हे मा बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत वाढले असल्यामुळे त्यांना सामान्य शिवसैनीकांच्या भावना समजतात महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्यातील शिवसैनीकाला संकंटात मदत करण्याची त्यांची तयारी असते,याउलट मातोश्रीवर आमदारांना पक्षप्रमुखानां भेटीचा वेळ मिळत नव्हता त्यामुळे आमदार व शिवसैनीकांना एकनाथ शिंदे साहेबां मध्ये एक आशेचा किरण दिसत आहे.त्यांनी जी आज भूमिका घेतली आहे ती उद्याच्या महाराष्ट्र व शिवसैनीकांच्या हिताची आहे म्हणुन आम्ही प्रा सुरेश नवले मित्रमंडळाचे सदस्य शिवलाल मुळूक,सुधीर सुपेकर,बिभीषण चव्हाण,बाळासाहेब काळे,कृष्णा वांगीकर,शहादेव घोडके,पांडूरंग भोसले,रामेश्वर कुंभारकर,रत्नाकर कुलकर्णी माजी सभापती बलभीमराव परजणे,राजेद्र ठाकूर,बापुसाहेब येळे,प्रभाकर जाधव,किशोर शिंदे,शिव खोसे पाटील,शहादेव शेळके, जाधव,भगवान पाटीलबुवा आहेर,श्रीराम लाटे,श्रीधरराव उकांडे,भास्कर सानप,भारत सांगुळे,सोनाजी क्षीरसागर,मिछिंद्र शिंदे पाटील,गणेश बनसोडे,बबनराव बहीर,विकास साळूंके,गणेश नवले आदी माजी मंत्री प्रा सुरेश नवले मित्रमंडळ पदाधिकारी यांनी ना एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here