Home Top News Beed: 24 तासात गोळीबार करणारे आरोपी जेरबंद

Beed: 24 तासात गोळीबार करणारे आरोपी जेरबंद

0
71

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

प्रारंभ वृत्तसेवा

बीड प्रतिनिधी :  माजलगाव ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी (ता. 30) तालखेड गावात ऊस तोड मजुराचा कार्यक्रम चालु होता. त्या ठिकाणी पाच जणांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. यानंतर पोलीसांनी यंत्रणा लावत 24 तासात गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळ्या आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा व माजलगाव ग्रामिण पोलीसांनी केली आहे. मंगळवारी (ता. 31) पत्रकार परिषद मध्ये पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी ही माहिती दिली.

माजलगाव ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीतील तालखेड परिसरात ऊसतोड मजुरांचा कार्यक्रम सुरु होता. याठिकाणी एका पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडीमध्ये संतोष उत्तम गायकवाड, दिलीप शिंदे व त्यांचे तीन साथीदार आले व त्यांनी येथील मजुरांना शिवीगाळ केली. त्यांना समजवण्यासाठी सखाराम साहेबराव जाधव हा गेला असता संतोष गायकवाड याने सखाराम साहेबराव जाधव यांना जिवे मारण्याचे उद्देशाने जवळ असलेल्या पिस्टल मधुन एक गोळी सखाराम जाधव यांचेवर फायर करून गंभीर जखमी केले. संतोष गायकवाड सदर ठिकाणावरून पळत जात असतांना गावकऱ्यांनी त्यास पकडून ठेवले. त्याचे साथीदार दिलीप सुधाकर शिंदे, बल्ल्या उर्फ श्रीकृष्ण सुखदेव गंधारे, सुरज उर्फ सुरेश रमेश मोरे, अशोक रमेश मोरे असे (फरार) आरोपीविरुध्द पो.स्टे. माजलगाव ग्रामीण 124/2022 कलम 307, 143, 147, 148, 149,323,504,506 भादंवि सह अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होत. संतोष उत्तम गायकवाड यास गावकऱ्यांनी पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले. त्याचेकडुन गुन्हयात वापरलेले एक गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस, दोन कत्त्या व एक चाकु व गुन्हयात वापरलेली वाहन स्कॉर्पिओ असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी नामे दिलीप सुधाकर शिंदे यास पो.स्टे. माजलगाव ग्रामीण यांनी अटक केली आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला फरार तीन आरोपीतांना तात्काळ अटक करण्यासाठी आदेशीत केले होते त्यावरून पो.नि.स्था.गु.शा. यांनी स्वतः घटनास्थळी भेट देवून फरार तीन आरोपीतांचा शोध सुरु केला. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे औरंगाबाद जिल्हयातील थेरगाव पाचोड येथे आहे. अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या टिमने पाचोड येथे जावून आरोपीचा थेरगाव वरून वडीगोद्री मार्गे पाठलाग करुन अंबड ते बीड रोडवरील पिटोरी सिरजगाव फाटया जवळ सापळा रचून आरोपी नामे 1) बल्ल्या उर्फ श्रीकृष्ण सुखदेव गंधारे, वय-25, रा. खंडोबा मंदिर, माजलगाव, 2) सुरज उर्फ सुरेश रमेश मोरे वय 21, रा.शिवनगाव ता. घनसांगवी जि.जालना, 3) अशोक रमेश मोरे, वय 23 रा.शिवनगाव ता. घनसांगवी जि.जालना यांना ताब्यात घेवून पो.स्टे. माजलगाव ग्रामीण येथे पुढील तपासकामी हजर करण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासह ग्रामिण पोलीसांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here