Home Top News आदर्श शिंदे यांचे भिमगीते ऐकण्यासाठी जनसागर लोटला 

आदर्श शिंदे यांचे भिमगीते ऐकण्यासाठी जनसागर लोटला 

0
70
आ.क्षीरसागरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास बीडरांकडून प्रचंड प्रतिसाद
बीड: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आ.संदीप क्षीरसागर यांनी, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम शुक्रवार (दि.१५) रोजी आयोजित केला होता.या कार्यक्रमास बीडरांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.बाबासाहेबांच्या सुपरहिट गीतांचा    आनंद हजारो बीडकरांनी घेतला.यावेळी उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
        बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण याठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आयोजनातून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमची सुरूवात बुद्धवंदनेने व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले यांना अभिवादन करुन झाला.यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमास आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम,माजी आ.सुनील धांडे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास हजारो बीडकरांनी आपली उपस्थिती लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here