Home Top News धक्कादायक; गुरुकूल इंग्लिश स्कुल येथील शिक्षकानेच काढली विद्यार्थींनीची छेड

धक्कादायक; गुरुकूल इंग्लिश स्कुल येथील शिक्षकानेच काढली विद्यार्थींनीची छेड

0
69
पालकांनी शिक्षकाला शिकवला चांगलाच धडा
शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरु

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरातील गुरुकूल इंग्लिश स्कुल येथील एका शिक्षकाने चौथी वर्गात शिकणाऱ्या मुलीची छेड काढल्याचा प्रकार आज (ता. 9) उघडकीस आला. यातील आरोपी शिक्षकाला पालकांनी चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

महिला, मुलींच्या छेड काढण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले असून हे रोखण्यासाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. परंतु हे प्रकार थांबता थांबेना असे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. बीड शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कुल मध्ये आज येथीलच एका शिक्षकाने चक्क चौथीच्या मुलीचे छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पालकांनी त्या शिक्षकाला चांगला चोप दिली आहे. याची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पालक व नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here