Home Top News माजी मंत्री आमदार सुरेश धस यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन…

माजी मंत्री आमदार सुरेश धस यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन…

0
72

आज रात्री 9 वाजता होणार, जामगाव येथे अंत्यसंस्कर

 

beed : राज्याचे माजी मंत्री तथा, आष्टी, पाटोदा शिरूरसह बीड जिल्हातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे भाजपा नेते आमदर सुरेश धस यांच्या मातोश्री. सुमन रामचंद्र धस यांचे आज दुपारी 2वाजता दुःखद निधन झाले असून त्या ८० वर्षाच्या होत्या. त्यानां प्रेमान सर्वजण आक्का म्हणत. त्यानां. देविदास धस आ.सुरेश धस.अशी दोन मुले असून, कैलासवासी. रामचंद्र दादा धस यांच्या नतंर, त्यांचे तालुक्याच्या राजकीय, सामाजिक शैक्षणिक, प्रशासकीय धार्मिक क्षेत्रात मोठ भरीव योगदान राहिलं आहे.

त्यांचा अंत्यविधी आज दिनांक ११ मार्च २०२२ रोजी रात्री ९ वाजता जामगाव येथे होणार आहे. माजी मंत्री.आमदार सुरेश धस, व माजी. जि. प. देविदास धस यांच्या आई तर , युवानेते. जयदत्त धस, श्याम धस, सागर धस यांच्या त्या आजी होत्या.
” राजकीय सामाजिक क्षेत्रात जनहिताचे अविरहितपणे काम करण्यासाठी, एक माता म्हूणन, आपल्या मुलांना उत्तम असे संस्काराचे धडे देत, बहुआयामी व्यक्तिमत्व घडवणाऱ्या मातोश्रीच्या जाण्याने तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली असून, सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here