Home Top News राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्‍वर चव्हाण यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्‍वर चव्हाण यांची नियुक्ती

0
69

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी राजेश्‍वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पक्ष बळकटीसाठी व जिल्ह्यात पक्षाचे धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावेत अशा शुभेच्छा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या कोणत्याच कार्यक्रमात दिसून येत नव्हते किंवा त्यांचे कामही तसे विशेष दिसून येत नव्हते यामुळे नवीन जिल्हाध्यक्षपदाची चर्चा होती. अखेर ती चर्चा खरी ठरली असून आज बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्‍वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here