Home Top News बीड शहरात गोळीबार; दोघे जखमी

बीड शहरात गोळीबार; दोघे जखमी

0
70
पोलीस घटनास्थळी दाखल;जखमींवर जिल्हारुग्णालयात उपचार सरु

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालय येथे आज (ता. 25) सकाळी 11 च्या दरम्यान जमिनीच्या वादातून गोळीबार झाला आहे. यात सतीश बबन क्षीरसागर (वय 30, रा. लक्ष्मणनगर) व फारुक सिद्दीकी (वय 28, रा. जालना रोड बीड) हे दोघे जखमी झाले आहेत.  घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गोळीबार होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसापुर्वी परळीत विक्रीसाठी आणलेल्या दोन पिस्टल पोलीसांनी जप्त केल्या होत्या. अनाधिकृत पिस्टलचे प्रमाण जिल्ह्यात वाढले असून यातुन असे प्रकार घडत आहेत. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालय येथे गोळीबार झाला असून यात दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here