Home Top News शिवसेना पदाधिकाऱ्याची घरात घुसून हत्या

शिवसेना पदाधिकाऱ्याची घरात घुसून हत्या

0
70

आधी तीन गोळ्या घातल्या नंतर कुऱ्हाडीने केले वार

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : यवतमाळ तालुक्यातील भांबराजा येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याची निघ्रृण हत्या करण्यात आलीय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या सुनील डिरवे यांची राहत्या घरात घुसून तीन व्यक्तींनी हत्या केलीय. आधी डिवरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला नंतर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली.

हा धक्कादायक घटनाक्रम गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडलाय. 40 वर्षीय सुनील डिवरे हे स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय लोकप्रितिनिधी होते. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही होते. डिवरे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी पंचक्रोशीमध्ये वाऱ्यासारखी परसली आणि त्यांच्या घराजवळ गर्दी जमा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here