Home Top News भरदिवसा युवकाचा खुन झाल्याने शहरात उडाली खळबळ

भरदिवसा युवकाचा खुन झाल्याने शहरात उडाली खळबळ

0
70

पोलीसांनी दोन  आरोपींना घेतले ताब्यात

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरातील बस स्थानक परिसरातील एचडीएफसी बॅंकेसमोर दोन अल्पवयीन नशेत असणार्यांनी धारदार शस्ञाने एका युवकावर हल्ला केला, यात युवकाची मृत्यु झाला असून शिवाजी नगर पोलीसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.

बीड शहरातील खासबाग येथील शेख शाहिद शेख सत्तार वय १९ असे मृत्य झालेल्या युवकाचे नाव आहे. सदरील युवक आज दुपारी चारच्या दरम्यान बीड बस स्थानक परीसरातील एचडीएफसी बॅंक परिसरात खासगी प्रवाशी वाहन भरत असताना, नशेत असलेले त्याचे दोन मिञ त्याठिकाणी आले व त्यांनी सदरील युवकाच्या पोटात चाकू खुपसला, यात युवकाचा मृत्यू झाला. यात एक १६ व एक १७ वर्षीय अशा दोन अल्पवयीन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. भरदिवसा व वर्दळीच्या ठिकाणी खुन झाल्यामूळे शहरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here