Home Top News शेती पंपाची लाईट तोडली, पाण्याअभावी पिके सुकू लागले; शेतकऱ्यानी केली आत्महत्या

शेती पंपाची लाईट तोडली, पाण्याअभावी पिके सुकू लागले; शेतकऱ्यानी केली आत्महत्या

0
70

गेवराई प्रतिनिधी : वीज वसुलीसाठी सध्या महावितरण कंपनीने शेतातील विद्युत पंपाचे कनेक्शन कट मोहिम सुरु केली आहे. यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामोहिमेच्या मनमानीमुळे आज (ता. २८)
गेवराई तालुक्यातील शेतकर्यांने आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आली आहे.
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील कृष्णा राजाभाऊ गायके वय २३ या युवक शेतकर्याने आज झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या शेतातील विज तोडल्यामुळे पिकांना पाणी देता येत नव्हते, डोळ्यासमोर पिके जळून जाप असल्यामुळे या युवक शेतकर्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच
गेवराई पोलीस स्टेशनला घटनास्थळी जावून पंचनामा केला.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . कृष्णा गायके यांना निपाणीजवळ का येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here