Home Top News शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीला वेग; मातोश्री वरुन या पदाधिकार्यांना निरोप… हे नेते मुंबईकडे...

शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीला वेग; मातोश्री वरुन या पदाधिकार्यांना निरोप… हे नेते मुंबईकडे रवाना!

0
64

प्रारंभ न्युज

बीड : गुटखा प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर नविन शिवसेना जिल्हा प्रमुख निवडीला वेग आला असून मंगळवारी नविन जिल्हा प्रमुखाची घोषणा होण्याची शक्यता आहे. याच अनूषंगाने येथील काही पदाधिकार्यांना मातोश्रीवरुन निरोप आले असून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

उद्या मुंबईत नविन जिल्हाप्रमुखाची घोषणा होणार असून या अनुषंगाने मुंबईकडे किसानसेनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, युवा नेते नितीन धांडे यांच्यासह इतर पदाधिकारी मुंबईकडे निघाले आहेत. शिवसेना बीड जिल्हाप्रमुखासाठी अनेकांनी जोर लावला असून प्रत्येकजण आपआपल्या परिने प्रयत्न करत आहेत. जिल्हाप्रमुख पदी कुणाची वर्णी लागते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here