Home Top News शिवसेना जिल्हाप्रमुखासाठी ही तीन नावे आघाडीवर…

शिवसेना जिल्हाप्रमुखासाठी ही तीन नावे आघाडीवर…

0
61

परमेश्वर सातपुते, अनिल जगताप, दिलीप गोरे

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : कुंडलिक खांडे यांचे पद स्थगित केल्यानंतर त्यांच्या पदासाठी लवकर निर्णय होणार असून त्यांच्या जागी आता हि तीन नावे आघाडीवर असल्याचे सुञांकडून समजत आहे. यात किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप व माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे या तीन नावापैकी एकाची लवकर निवड करण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे.

अवैद्य गुटखा प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई
करण्यात आली आहे. त्याच्या जागी आता लवकर नव्या जिल्हा प्रमुखाची निवड करण्यात येणार आहे. त्याच्या जागी तीन नावे आघाडीवर असून, यात किसानसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शिवसैनिकांना आता खमक्या जिल्हाप्रमुखाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here