Home Top News त्या बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला

त्या बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला

0
95

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरापासून जवळच असणाऱ्या कपिलधार येथून दोन मुले पाण्यात वाहून गेल्या नंतर यातील एकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले होते तर एक जण बेपत्ता होता. बेपत्ता मुलाचा मृतदेह बुधवारी सकाळी पोलीसांना सापडला.

प्राप्त माहितीनुसार बीड शहरातील यशराज राहूल कुडके व ओमकार सचिन विभूते हे दोघे कपिलधारला फिरायला गेले होते. याच दरम्यान त्यांनी दुचाकी कपिलधार परिसरातील सिमेंटच्या रस्त्यावरुन स्लिप झाली होती. यानंतर दोघेही नदीच्या पाण्यात वाहून जात होती. यातील ओमकारला ग्रामस्थांनी वाचवले होते. परंतु यशराजला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले नाही. त्याचा मृतदेह आज येथील शिंदे यांच्या शेतात आढळून आला आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here