Home Top News एकाच घरातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकलींचा मृत्यू तर आईवर उपचार सुरु

एकाच घरातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकलींचा मृत्यू तर आईवर उपचार सुरु

0
107

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : केज तालुक्यातील सोनेसांगवी नं.2 येथे मध्यरात्री एकाच घरातील तिघींना सर्पदंश झाला. यात दोन मुली दगावल्या असून आईवर उपचार सुरु आहेत.

केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील दीपक साखरे हे त्यांच्या चार मुली व पत्नीसह त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. या दरम्यान सौ.जयश्री दीपक साखरे वय 30, कु. स्वप्नाली दीपक साखरे वय 4 वर्ष, कु.स्वीटी दीपक साखरे वय 3 वर्ष या तिघींना विषारी साप चावला. यानंतर साप दीपक यांच्या अंगावर गेला, परंतु साप अंगावर आल्यामुळे दीपक यांना जाग आली असता त्यांनी सापाला मारले. यानंतर त्यांच्या लक्षात आले की, स्वप्नाली व स्वीटीचा यांचा यात मृत्यू झाला आहे. तर सौ. जयश्री साखरे यांना सुद्धा साप चावला आहे. यांनतर दीपक यांनी जयश्री यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी ॲडमिट केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने सोनेसांगवी गावावर दुख;चा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here