Home Top News कपिलधार येथून दोन अल्पवयीन मुले पाण्यात वाहून गेले!

कपिलधार येथून दोन अल्पवयीन मुले पाण्यात वाहून गेले!

0
112

ग्रामस्थांनी एकाला वाचवले तर एक बेपत्ता!

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून अनेक जण निसर्गाची पाहणी करण्यासाठी बाहेर जात आहेत. परंतु बाहेर गेल्या नंतर प्रत्येकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. आज बीड शहरातील दोन अल्पवयीन मुले कपिलधार येथे फिरायला गेले होते. परंतु या दरम्यान दोघेही पाण्यात वाहून गेले, यातील एकाला येथील ग्रामस्थांनी वाचवले तर एक जण अजूनही बेपत्ता असून त्याचा सोध घेणे सुरु आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार यशराज कुडके (वय 17) रा. कबाड गल्ली. बीड व ओंकार विभूते (वय 17) रा. माळीवेस बीड हे दोघे आज दुपारी दोनच्या दरम्यान कपिलधार येथे जात असताना कपिलधार परिसरातील सिमेंटच्या रस्त्यावरुन त्यांनी दुचाकी स्लीप झाल्यामुळे दोघेही नदी पात्रात वाहून जाऊ लागले, यादरम्यान येथील ग्रामस्थांनी तातडीने नदीपात्रात उड्या घेत ओंकारला बाहेर काढले. परंतु त्यांना यशराजला बाहेर काढण्यात यश आले नाही. सध्या त्याठिकाणी बचाव कार्य सुरु आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here