Home Top News 5009 अहवालात 241 अहवाल पॉझिटिव्ह!

5009 अहवालात 241 अहवाल पॉझिटिव्ह!

0
76

बीड, आष्टी, पाटोदा तालुक्यात जास्त रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात आज 5009 अहवालात 241 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात बीड, आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊन असून सुद्धा जिल्ह्यात कोरोना वाढु लागल्याने जिल्ह्याची चिंता परत वाढू लागली आहे.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून 5009 अहवालचा रिपोर्ट प्राप्त झाला, यात 4768 अहवाल निगेटिव्ह आले तर 241 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 05, आष्टी 44, बीड 50, धारुर 16, गेवराई 19, केज 10, माजलगाव 05, परळी 01, पाटोदा 33, शिरुर 39, वडवणी 09 असे रुग्ण जिल्ह्यात वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here