Home Top News कोरोना टेस्ट वाढताच आकडा पण वाढू लागला

कोरोना टेस्ट वाढताच आकडा पण वाढू लागला

0
122

 

आज फक्त तीन तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण
-जिल्ह्यात 224 नव्या रुग्णांची भर

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवल्यामुळे कोरोनाचा आकडा वाढू लागला आहे. आज जिल्ह्यात 224 नव्या रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे फक्त तीन तालुक्यात दहा पेक्षा कमी रुग्ण आढळून आले. काल जिल्हाच्या तुलनेत आज जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढला असून टेस्ट सुद्धा आज जास्त करण्यात आल्या आहेत. काल 2895 टेस्ट करण्यात आल्या होत्या तर आज 3424 टेस्ट करण्यात आल्या.
आज आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या 3424 अहवाला पैकी 3200 अहवाल निगेटिव्ह आले तर 224 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 18, आष्टी 43, बीड 30, धारुर 08, गेवराई 28, केज 34, माजलगाव 06, परळी 20, पाटोदा 11, शिरुर 17, वडवणी 09 असे एकूण 224 रुग्ण जिल्ह्यात वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here