Home Top News बीड परळी महामार्गावर अपघात;एक जण जागीच ठार

बीड परळी महामार्गावर अपघात;एक जण जागीच ठार

0
110

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : बीड परळी महामार्गावरील नेहरकर हॉटेल परिसरात आज सकाळी कारचा व ट्रॅव्हल्सचा सामोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला.

देवडी येथील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे बीड येथे स्विफ्ट गाडी (एम एच 02 सिपी 5226) कामानिमित्त पहाटे निघाले होते. याच दरम्यान पुण्यावरून परळीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची (एम एच 29 व्ही 7227) समोरासमोर धडक झाली. या अपघातात राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here