Home Top News दुर्दैवी घटना: पोहायला गेलेल्या तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

दुर्दैवी घटना: पोहायला गेलेल्या तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

0
86

बाय लेकासह भाच्याचा यात समावेश

गेवराई: शिवनाथ काळे

गेवराई : तालुक्यातील दैठण येथील शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन जणांना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली.

सुनिल जगन्नाथ पंडीत वय 40 व त्यांचा मुलगा राज सुनिल पंडीत वय १३, भाच्चा आदित्य गोरख पाटील हे तिघे येथील शेत तलावात पोहण्यासाठी गेले होते, याच दरम्यान पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे एपीआय श्री नवघरे, श्री माने, श्री राऊत, श्री वडकर, श्री गायकवाड यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. तिन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here