Home Top News धक्कादायक: खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू!

धक्कादायक: खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू!

0
1224

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरापासून जवळच असणार्या पांगरबावडी येथील खदाणीत तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १६) चारच्या दरम्यान घडली.

शहरातील गांधी नगर भागातील युवक पोहण्यासाठी पांगरबावडी येथे गेले होते. याच दरम्यान तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरु होता. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोनि संतोष साबळे , सपोनि.योगेश उबाळे , फौजदार पवनकुमार राजपुत , रोटे , पोह.आनंद मस्के , राऊत , सानप , दुबाले , जायभाये , तांदळे आदींनी घटनास्थळाला भेट दिली असून पुढील तपास ग्रामिण पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here